Tests Of Divisibility ! विभाज्यतेच्या कसोट्या.भाग -1

 

 

Tests Of Divisibility
विभाज्यतेविषयी महत्वाचे

🌐 Www.Ganitmanch.com

जेव्हा एका संख्येला दुसऱ्या संख्येने निःशेष भाग (पूर्ण भाग) जातो तेव्हा ती संख्या त्या दुसऱ्या संख्येने विभाज्य आहे असे म्हणतात. जसे 64 या संख्येला 8 ने भाग जातो. 64 ही संख्या 8 ने विभाज्य आहे असे म्हणतात. आणि 64 ला 8 चा विभाज्य म्हणतात तर 8 ला 64 चा विभाजक म्हणतात.

64 चे विभाजक 1,2,4,8,16,32,64.

📙 विभाज्यतेच्या कसोट्या 📙

📌🌎 1] 1 ची कसोटी: कोणत्याही दिलेल्या संख्येला 1 ने पुर्ण भाग जातो. परंतु भागाकार मात्र दिलेल्या संख्येएवढाच येतो.

उदा. 16/1 ,18/1,45/1,701/1

📌🌎 2] 2 ची कसोटी: ज्या संख्येच्या एककस्थानी 0,2,4,6,8 यापैकी कोणतातरी अंक असतो त्या संख्येला 2 ने पूर्ण भागजातो.

उदा. 512 9,176, 8,000

🌐 Www.Ganitmanch.com

📌🌎 3 ) 3 ची कसोटी: ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 4,536, 312, 876 जसे 4,536 मधील 4+5 +3+6 = 18, 18 ला 3 ने पूर्ण भाग जातो. 4,536, ला 3 ने पूर्ण भाग जातो.

📌🌎 4) 4 ची कसोटी: ज्या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकानी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. उदा. 948, 1,032 जसे 948 मधील 48 ला 4 ने पूर्ण भाग जातो. 948 ला 4 ने भाग जातो.

📌🌎 5 ) 5 ची कसोटी: ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. उदा. 75, 1,060,1050

📌🌍 6 ) 6 ची कसोटी: ज्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. उदा. 53,118 ला 2 ने 3 ने भाग जातो. 53, 118 ला 6 ने भाग जातो.

🌐 Www.Ganitmanch.com

📌🌎 7) 7 ची कसोटी: दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकाची दुप्पट करुन बाकी अंकापासून बनलेल्या संख्येतून वजा करुन बाकी राहिलेल्या संख्येस 7 ने भाग गेल्यास दिलेल्या संख्येस 7 ने पुर्ण भाग जातो. उदा. 392 यामधील शेवटचा अंक 2 ची दुप्पट 4 व उरलेल्या अंकापासूनच्या संख्येतून वजा केल्यास 39-4 = 35 येते. 35 ला 7 ने पुर्ण भाग जातो म्हणून 392 ला 7 ने पुर्ण भाग जातो. तसेच कोणत्याही संख्येत फक्त एकच अंक 6 वेळा किंवा 6 च्या पटीत वेळेस आल्यास त्या संख्येस 7 ने पुर्ण भाग जातो. उदा. 444444 ला 7 ने पुर्ण भाग जातो. 888888888888 या संख्येत 8 हा अंक 6 च्या पटीत म्हणजे 12 वेळा आला म्हणून 888888888888 ला 7 ने पुर्ण भाग जातो.

📌🌏 8) 8 ची कसोटी: दिलेल्या संख्येतील शतक, दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जात असेल किंवा शेवटी कमीतकमी तीन शून्ये असतील तर त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. उदा. 1,000 (शेवटी तीन शून्य म्हणून 8 भाग जातो), 9,752 मधील 752 ला ने 8 पूर्ण भाग जातो. 9,752 ला 8 ने पूर्ण भाग जातो.

🌐 Www.Ganitmanch.com

📌🌍 9 ) 9 ची कसोटी : दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 4, 15, 818 मधील

4+1 +5+ 8 +1 + 8 = 27

27 ला 9 ने पूर्ण भाग जातो. 4,15,818 ला 9 ने पूर्ण भाग जातो.

📌🌎 10 ) 10 ची कसोटीःज्या संख्येच्या एककस्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो..
उदा. 50, 8190,300,500

🌐 Www.Ganitmanch.com

📌🌎 11 ) 11 ची कसोटी: एखाद्या संख्येतील सम स्थानच्या अंकाची बेरीज व विषम स्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक शून्य अथवा 11 च्या पटीत असल्यास त्या संख्येला 11 ने पूर्ण
भाग जातो.
उदा. 1,14,345

(सम स्थानच्या अंकाची बेरीज) – (विषम स्थानच्या अंकाची बेरीज) = (4 +4 + 1) – (5 + 3 + 1)
= 9- 9 = 0 .1,14,345 ला 11 ने पूर्ण भाग जातो.

◾️ भाग 2 मध्ये 12 ते 20 पर्यंतच्या कसोट्या येतील 👍

❇️ सपर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top