Mathematics Practice Papers ! Ganit Test ! गणित सराव पेपर ! गणित सराव टेस्ट -33

Mathematics Practice Papers ! Ganit Test ! गणित सराव पेपर ! गणित सराव टेस्ट

 

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद ,नगरपरिषद ,पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

देशात दररोज रेल्वे, बँका, पोलीस, सैन्य अशा विविध क्षेत्रातील सरकारी नोकऱ्या बाहेर पडत असतात. ज्यासाठी लाखो लोक अर्ज करतात आणि परीक्षेची तयारी करतात आणि परीक्षा देतात. पण काही मोजकेच लोक आहेत जे परीक्षा उत्तीर्ण होतात आणि सरकारी नोकरीसाठी निवडले जातात.

अनेकांना सरकार मिळत नसल्याने ते हताश झाले आहेत… सरकारी नोकऱ्या न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्याचे एक कारण हे देखील आहे की त्याने एकतर मेहनत केली नाही किंवा कुठेतरी ज्ञानाची कमतरता होती.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमची गणित या विषयाचे ज्ञान पातळी वाढवणे सर्वात महत्त्वाचे आहे. सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षेत विचारलेल्या सर्व विषयांपैकी गणित हा एक असा विषय आहे जो उमेदवाराला परीक्षेत उंचावू शकतो..

जर तुम्हाला इतरांपेक्षा पुढे जायचे असेल तर गणित या विषयावर तुमची चांगली पकड असणे महत्त्वाचे आहे. तुम्हा सर्व उमेदवारांना लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला दर्जेदार गणित या विषयाच्या www.Ganitmanch.Com ठिकाणी आम्ही तुम्हाला फ्री मध्ये देत असतो. जे सोडऊन तुम्हाला परीक्षेत खूप मदत होईल. आता तुम्ही आमच्या या पेजवरून गणित च्या फ्री टेस्ट देऊ शकता.

गणित टेस्ट [ MATH QUIZ TEST ]

🚔 आजची गणित सराव टेस्ट सोडवा ही खूप महत्वाची सराव टेस्ट आहे TCS व IBPS मध्ये हे प्रश्न नक्की दिसतील सर्वांनी ही टेस्ट सोडवा व आपले कोणते प्रश्न चुकले ते व्यवस्थीत पाहून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा.

❇️ एकूण प्रश्न – 30

❇️ Passing – 15

✓  Math Practice Test in marathi

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट – 33 सोडवा.

गणित सराव टेस्ट - 33

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, जिल्हा परिषद ,नगरपरिषद ,पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

1 / 30

800 मीटर लांबीची आगगाडी ताशी १० किमी वेगाने जाते. तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?

2 / 30

350 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 144 किमी वेगाने 450 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

3 / 30

एका कॅमेऱ्याची छापील किंमत 1,400 रु. आहे दुकानदाराने तो ग्राहकाला 1,316 रुपयांस विकला तर शे. सुट किती दिली?

4 / 30

मनोज एक कार 2,25,000 रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात त्याने दलालास 2% दलाली दिली तर त्याला ती कार किती रुपयांस मिळाली?

5 / 30

एका ठराविक रकमेवर 4 वर्षासाठी द.सा.द.शे. रु 10 दराने सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक रु 1,282 आहे, तर मुद्दल किती?

6 / 30

3 वर्षांसाठी दरसाल 10% दराने एका विशिष्ट रकमेवरील सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक रु. 186 आहे. ती रक्कम खालीलपैकी कोणती आहे ?

7 / 30

5000 रुपयांवर दरसाल 10% व्याजदराचे 3 वर्षांसाठीच्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक काढा.

8 / 30

3,750 मुद्दल असुन 10 वर्षात 1,500 रुपये सरळव्याज होते. तर व्याजाचा दर किती असेल ?

9 / 30

2,500 मुद्दलाचे 5 वर्षांत 1,375 सरळव्याज होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा ?

10 / 30

दोन वस्तू प्रत्येकी 100 रुपयाला विकत घेतल्या असता त्यातील एक वस्तू विकताना 20% तोटा व दुसरी वस्तू विकल्यावर 20% नफा झाला. दोन्ही वस्तूंवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला ?

11 / 30

100 शिलाई मशिने काही रुपयांना विकल्याने शे. 25 नफा झाला तर प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा नफा किती झाला?

12 / 30

एक वस्तू 65 रुपयांस खरेदी करून 70 रुपयांस विकली तर शे नफा अगर तोटा किती हाईल?

13 / 30

रमेशने 3,000 रुपयाला खरेदी केलेली सायकल काही दिवसांनी 1,800 रुपयाला विकली तर त्याला किती तोटा झाला ?

14 / 30

एका सायकलची खरेदी किंमत 2,700 रुपये आहे. जर ती सायकल विकुन 500 रु. नफा होत असेल तर सायकलची विक्री किंमत काढा.

15 / 30

√136 / √1.36  = किती?

16 / 30

1382 ला पूर्ण वर्ग करण्यासाठी त्यातून वजा करावी लागणारी लहान संख्या कोणती आहे ?

17 / 30

पलानी आणि कीर्ती ह्यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:4 आहे. इथून पुढे तीन वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 11:9 असेल. तर कीर्तीचे सध्याचे वय किती ?

 

18 / 30

दोन संख्या जर तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 35% आणि 55% ने मोठ्या असतील तर त्या दोन संख्यांचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर किती असेल?

19 / 30

अ व व यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे, त्यांच्या वयातील फरक 8 वर्षे आहे. तर अ चे वय किती ?

20 / 30

रिनाचे पाच वर्षांपूर्वीचे वय 25 वर्षे होते, तर ती किती वर्षांनी 45 वर्षांची होईल ?

21 / 30

प्रणिता, प्रतिभा व शिल्या यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 व त्यांच्या वयाची बेरिज 180 असेल तर शिल्पाचे वय किती?

22 / 30

कोमल व रिता यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 3 आहे. त्यांच्या वयाची वेरिज 35 वर्षे आहे. तर कोमलचे वय किती ?

23 / 30

साखरेची किंमत शे. 10 ने वाढल्याने तिचा खप 10% ने कमी झाला तर उत्पन्नात काय फरक पडेल?

24 / 30

10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दूधात मलईचे प्रमाण किती?

25 / 30

888 च्या 300% =  किती ?

26 / 30

8 च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी काढा?

27 / 30

संपदा ऑफिसला जाताना 60 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 30 किमी/तास वेगाने करते तर तिचा सरासरी वेग किती?

28 / 30

आज राम व शाम यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. व वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. तर 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल?

29 / 30

दोन संख्यांचा मसावि आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती ?

30 / 30

दोन संख्या 6X व BX असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे तर x = ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top