Math Test -4 ! गणित टेस्ट

येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त संभाव्य गणित टेस्ट नक्की सोडवा.

4

गणित टेस्ट - 4

1 / 15

एका दुधवाल्याने 50 लिटर दुधातून 10 लिटर दुध काढून 10 लिटर पाणी टाकले. पुन्हा 10 लिटर मिश्रण काढून त्यात 10 लिटर पाणी टाकले तर त्या भांड्यात किती दूध शिल्लक राहिले ❓

2 / 15

आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40%गुणांची गरज असते. तिला 210 गुण मिळतात. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात, तर परीक्षेतील अधिकाधिक गुण किती?

3 / 15

एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?

4 / 15

चार मित्रांपैकी तीन मित्र प्रत्येकी 40 रुपये खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 30 रुपये अधिक खर्च करतो.तर चार मित्रांचा एकूण खर्च किती ❓

5 / 15

माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत ,उरलेले लोक एकएकटेच आहेत ,यापैकी विवाहित लोकांची संख्या 60 % आहे. आणि पुरुषांची संख्या 54 % आहे ,तर या गटात एकएकट्या स्रियांची संख्या टक्के आहे ?

6 / 15

P आणि Q यांच्या उत्पनाची सरासरी 5050 रु.आहे.Q आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 6250 रु.आहे.P आणि R यांच्या उत्पनाची सरासरी 5200 रु.आहे.तर P चे उत्पन्न किती ❓

7 / 15

तीन मुळ संख्याची बेरीज 204 आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती?

8 / 15

10 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती?

9 / 15

एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓

10 / 15

एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती?

11 / 15

मयुरने 140 रुपये प्रति किलोप्रमाणे 30 किलो चहा विकत घेऊन त्यात 150 रुपये किलो दराचा 20 किलो चहा मिसळला या मिश्रणावर मयूरला 20 टक्के नफा हवा असल्यास त्यांने ते मिश्रण काय भावाने विकावे ❓

12 / 15

A आणि B एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास B आणि C हे 24 दिवस आणि A व C हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?

13 / 15

एका रकमेचे पाच वर्षांचे सरळव्याज 750 व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाढव्याज 318.75 रु. आहे तर ती रक्कम कोणती ❓

14 / 15

एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत ,त्यापैकी मुलांचे सरासरी वय 12 वर्षे आणि मुलींचे सरासरी वय 11 वर्षे आहे. जर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11 वर्षे 9 महिने असेल तर शाळेतील एकूण मुले किती ❓

15 / 15

एक रेल्वे 20 m/s वेगाने गेल्यास
त्या दिशेने धावत 5 m/s वेगाने धावत असणार्या व्यक्तीला 30 से. ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top