🔥 जिद्द काय असते ते नक्की वाचा हा लेख. 🔥

 

नाव – रीहा बुलोज. वय फक्त ११. देश फिलीपाईंस. मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण…बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर ..शक्य नाही .., परवडत नाही. म्हणता म्हणता ..देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली.. ही ..फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे.. हीच्याकडे शूज नव्हतेच मुळी…मग जखमेवर लावायच्या पट्ट्या बुटासारख्या ..पायावर लावल्या.. त्यावर पेनाने लिहले..NIKE आणि जीव तोडून पळाली…. ४००/८००/१५०० तीनही गोल्ड मेडल्स खिशात…. तीचे पेनाने लिहलेले पट्टी शूज फेमस झाले.. NIKE कंपनीने दखल घेतली.. आणि … चक्क तीचा पूर्ण खर्च कायम स्वरूपी करायची तयारी दर्शवली. परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो ….शूज मध्ये नाही… अभ्यास डोक्यात भिनलेला असावा लागतो पुस्तकात नाही. आपण प्रथम मनात ठरवावे लागते.. मला हे निभावायचे का नाही.. नाहीतर..

हजारो रुपयांचे बुट आणले की प्रॅक्टिस सुरू करण्याचा निश्चय करणारे,

लाखो रुपयांचे क्लासेस लावले की मग अभ्यास सुरू करणार, असा निश्चय करणारे

अगोदर महागडा वजन काटा आणून मग डाएटिंग सुरू करण्याचा निश्चय करणारे

हजारो रूपयांची इक्विपमेंट्स विकत घेऊन नुसत्याच पोकळ निश्चयाचे महामेरू ?

✓  लेख आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top