!!…स्वतःवर विश्वास…!!
लोकांकडून ठेवण्यापेक्षा सागररूपी अपेक्षा
स्वतःच्या मनात अपेक्षेचा किनारा ठेव
लोकांनी तुजवर दाखवला जर अविश्वास
तरी तू मात्र स्वतःवर विश्वास ठेव,
यशोमार्गी कितीही आल्या अडचणी
तरी तू खचून जाऊ नकोस
लढण्यास सज्ज होऊन
तू मात्र स्वतःवर विश्वास ठेव,
वेळेवर परीक्षा होत नाही
याचा विचार करण्यापेक्षा
वेळेवर अभ्यास करण्याची तयारी ठेव
तरी तू मात्र स्वतःवर विश्वास ठेव,
काय करशील भविष्यात असे
म्हणवून आपलेच तुला माञ चिडवतील
त्यांचा विचार करून खचण्यापेक्षा
तू माञ स्वतःवर विश्वास ठेव,
जीवन झाले असले अंधकारमय
तरी तू आशेचा पथदिवा ज्वलंत ठेव
तू माञ अंधकारात हरवून न जाता
स्वतःवर माञ विश्वास ठेव,
नाही झाले काही तर काय होईल?
याचा विचार करण्यापेक्षा
काहीच नाही झाले तर भरपूर काही होईल
असा विचार करून
स्वतःवर माञ विश्वास ठेव,
चल उठ हो सावधान
करण्यास वार तू हो विराजमान
चल आता करू नकोस विचार
करून नव्याने सुरवात खंबीर हो
आणि
स्वतःवर माञ विश्वास ठेव
स्वतःवर माञ विश्वास ठेव…!!!
You must log in to post a comment.