Tests off Divisibility ! विभाज्यतेच्या कसोट्या – भाग : 2

 

Tests off Divisibility ! विभाज्यतेच्या कसोट्या – भाग : 2

📌🌍12) 12 ची कसोटी: दिलेल्या संख्येला 4 ने व 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 216 ला 4 ने व 3 ने पूर्ण भाग जातो. 216 ला 12 ने भाग जातो.

Www.Ganitmanch.Com

📌🌎13 ) 13 ची कसोटी: एखाद्या संख्येतील शेवटच्या अंकाला 4 ने गुणून येणारी संख्या व अगोदरच्या संख्येतील उरलेली संख्या यांच्या बेरजेला 13 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 234 यातील 4 ला 4 ने गुनु व वर सांगीतल्याप्रमाणे बेरीज करु 23+ 4×4 = 23+16 = 39, 39 ला 13 ने भाग जातो. 39/13 = 3.
234 ला ही 13 ने पूर्ण भाग जातो. दुसरी मोठी संख्या 3328, 332+8×4 = 332+32= 364 पुन्हा 36+4×4 = 36+16= 52 ला 13 ने पूर्ण भाग जातो. म्हणून 3328 ला ही 13 ने पूर्ण भाग जातो.

Www.Ganitmanch.Com

📌🌍14 ) 14 ची कसोटी : एखाद्या संख्येला जर 2 ने व 7 ने भाग पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 14 ने ही पूर्ण भाग जातो.

उदा. 350 ला 2 ने व 7 ने पूर्ण भाग जातो म्हणून 14 ने ही पूर्ण भाग जातो.

📌🌍15) 15 ची कसोटी : दिलेल्या संख्येला 3 ने व 5 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 300 ला 3 ने 5 ने पूर्ण भाग जातो. म्हणून 300 ला 15 ने पूर्ण भाग जातो.

Www.Ganitmanch.Com

📌🌍16) 17 ची कसोटी : एखाद्या संख्येतील शेवटच्या अंकास 5 ने गुणून आलेले उत्तर हे उरलेल्या संख्येतून वजा करुन उरलेल्या संख्येस 17 ने पूर्ण भाग गेल्यास त्या दिलेल्या संख्येला 17 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 493 यातील शेवटचा अंक 3×5 = 15,
49-15 = 34 ला 17 ने पूर्ण भाग जातो. म्हणून 493 ला ही 17 ने पूर्ण भाग जातो.

📌🌍17) 18 ची कसोटी: दिलेली संख्या सम असेल आणि तिला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 18 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 288 ही सम आहे. 2 +8+ 8 = 18
9 ने 18 ला पूर्ण भाग जातो.
• 288 लाही 9 ने पूर्ण भाग जातो.
• 288 ला 18 ने पूर्ण भाग जातो.

Www.Ganitmanch.Com

📌🌎18) 25 ची कसोटी: एखाद्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 25 ने पूर्ण भाग गेल्यास किंवा संख्येच्या शेवटी दोन शून्य असल्यास दिलेल्या संख्येला 25 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 5025 यातील शेवटचे दोन अंक 25 ला 25 ने पूर्ण भाग जातो. म्हणून 5025 ला 25 ने पूर्ण भाग जातो. तसेच 10000 यातील शेवटचे दोन अंक शून्य आहेत म्हणून या संख्येला 25 ने पूर्ण भाग जातो. म्हणून कोणत्याही संख्येच्या शेवटी किमान दोन शून्य असतील त्या संख्येला 25 ने भाग जातो.

Www.Ganitmanch.Com

📌🌎19) 36 ची कसोटी:दिलेल्या संख्येला 9 ने व 4 ने पूर्ण भाग जात असल्यास 36 ने पूर्ण भाग जातो.
उदा. 180 ला 9 ने व 4 ने पूर्ण भाग जातो. : 180 ला 36 ने पूर्ण भाग जातो.

📌🌍20) 72 ची कसोटी ; दिलेल्या संख्येला 9 ने व 8 ने पूर्ण भाग जात असल्यास 72 ने पूर्ण भाग जातो.
उदा. 288 ला 9 ने व 8 ने पूर्ण भाग जातो. : 288 ला 72 ने पूर्ण भाग जातो.

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांना share करा.

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top