PSI – STI – ASO पूर्व परीक्षा 2022 , 8 ऑक्टोबर 2022 ,संपूर्ण गणित स्पष्टीकरण

PSI – STI – ASO पूर्व परीक्षा 2022 ,8 ऑक्टोबर 2022 ,संपूर्ण गणित स्पष्टीकरण 👇

🌎 प्रश्न क्रमांक – 1

अनुक्रमे 1 से 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.

47 

37

48

49 ✅

🌅 स्पष्टीकरण 👇👇

पहिली संख्या + शेवटची संख्या / 2 × एकूण संख्या

(1 + 97 ) × 97

98 × 97 /  2 × 97 = 49 ✅

 

🌎 प्रश्न – 2 

250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 कि.मी. वेगाने धावते तर 250 मी. लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल ?

36

40✅

50

45 

📌स्पष्टीकरण 👇👇

250 + 250 = 500

500 × 18 / 45 × 5 = 40 सेकंद.✅

 

🌎 प्रश्न – 3 

A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B. एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?

60 ✅

45

40

30

📌 स्पष्टीकरण 👇👇

A + B = 15                       

      B = 20                  

 लसावी = 60

60÷ 15 = 4 ( A+B क्षमता )

60÷ 20 = 3 (B ची क्षमता)

B 3 दिवसात करतो.

A व B 4 दिवसात करतो म्हणजे [ 4 -3 ] A ची क्षमता = 1 येईल 

एकूण काम = 60 ÷ 1 = 60 

A ला ते काम करायला 60 दिवस लागतील.✅

🌎 प्रश्न क्रमांक – 4 

रविने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदीची किंमत रुपये 2014 असेल तर रविची खरेदीची किंमत किती ?

 रूपये 2000 ✅

 रूपये 2011 

 रूपये 2020 

 रूपये 1900

🗓 स्पष्टीकरण 👇👇

2014 × 100 × 100/ 106 × 95 = 2000 खरेदी किंमत ✅

     

🌎 प्रश्न क्रमांक – 5

एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती?

4.8 किमी/तास ✅

5 किमी / तास

4.2 किमी / तास

5.6 किमी/तास

🗓 स्पष्टीकरण 👇👇

4 × 6 × 2/(4+6) = 4.8 km/hr ✅

 

🌎 प्रश्न – 6

एका सांकेतिक लिपीत RED = 9 आणि BLUE = 10 तर WHITE = ?

13 ✅

15

17

19

❇️ स्पष्टीकरण 👇👇

•RED = 3अक्षर

18+5+4 = 27

27/3 = 9

•BLUE = 4 अक्षर 

2+12+21+5=40

40/4= 10

•WHITE = 5अक्षर

 23+8+9+20+5 = 65

65/5 = 13 ✅

🌎 प्रश्न – 7

एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत ?

20%

15%

10%✅

5%

🗓 स्पष्टीकरण 👇👇👇

एकूण खेळाडू 80 आहेत.

36 खेळाडू कब्बडी 

48 खेळाडू क्रिकेट 

36 + 48 = 84 खेळाडू 

84 – 12 = 72 खेळतात 80 पैकी 8 खेळाडू खेळत नाही.

8 × 100 ÷ 80 = 10 % ✅✅

🌎 प्रश्न -8

आंब्याचे झाड पेरू व लिंबुच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड लिंबुच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही.

खालीलपैकी कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत?

(i) लिंबुचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे.

 (ii) पपईचे झाड नारळ आणि लिंबुच्या झाडाच्या मध्ये आहे.

(iii) पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे.

पर्यायी उत्तरे

(1) फक्त विधाने (i) आणि (ii) बरोबर आहेत.

(2) फक्त विधाने (i) आणि (iii) बरोबर आहेत.

(3) फक्त विधाने (ii) आणि (iii) बरोबर आहेत.

(4) विधाने (i), (ii) आणि (iii) बरोबर आहेत.✅

 

🗓 स्पष्टीकरण 👇👇

पेरू , आंबा ,लिंबू , पपई , नारळ

अश्या प्रकारे रचना केल्यास सर्व विधान योग्य आहेत.✅

🌎 प्रश्न – 9

आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रीक खांबांची संख्या मोजते आहे. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किमी आहे तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील ?

7 तास ✅

6 तास

5 तास

3 तास

🌅 स्पष्टीकरण 👇👇

1000 मीटर मध्ये एकूण खांब काढू..

1000/50  = 20 खांब.

गाडीचा वेग = 40km/hr आहे.

40 × 20 = 800 खांब एका तासात.

5601 यातील शेवटचा खांब वजा करून टाका.तो ओलांडण्याची गरज नसते.

5600 / 800 = 7 तास लागतील ✅

🟠 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.👍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top