WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 57

Math and Intelligence Practice Test Paper | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 57

🚨 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नसंच. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा.

🎯MPSC, Police, Talathi, ZP, SSC, Banking इत्यादी सर्व परीक्षांमध्ये गणिताचा मोठा वाटा असतो. चांगले गुण मिळवायचे असतील तर गणित पक्कं असणं गरजेचं आहे.

⚙️आजच्या टेस्ट मध्ये तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. पास होण्यासाठी तुम्हाला 13 गुण गरजेचे आहे.🧑‍🎄

🧑‍🎄गणितामुळे व बुध्दीमत्ता मुळे तर्कशक्ती (Reasoning Power) आणि विचार करण्याची क्षमता वाढते. आपण समस्यांकडे व्यवस्थित विचार करून पाहायला शिकतो त्यामुळे गणित विषयाचा जास्त सराव करा.

🧠 “दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🧑‍🎄”गणित व बुध्दीमत्ता विषयात जिंकायचं असेल तर थोडे विचारांना पण दिशा द्या!”

👉 खाली दिलेल्या Start बटणावर Click करा.

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 25

माझ्याकडील रक्कम दररोज दुप्पट होते. एका महिन्याच्या 20 तारखेला माझ्याकडे 10,000 /- रूपये होते तर त्याच महिन्याच्या 15 तारखेला माझ्याकडे किती रक्कम होते ?

2 / 25

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु. 42000 आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ?

3 / 25

ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 480 मी. लांबीच्या मालगाडीस 420 मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

4 / 25

12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील ?

5 / 25

पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 9 किलोग्रॅम आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती ?

6 / 25

दोन संख्यांची बरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्याचे गुणोत्तर किती ?

7 / 25

एका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्या किती?

8 / 25

रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15 किलो आहे. त्यांच्या वजनाचा अनुपात अनुक्रमे 2:3:4 असा अहे. तर रुपेश, दिनेश, महेश यांचे वजन किती?

9 / 25

एका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन विषयात घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?

10 / 25

इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला तर वस्तुची खरेदी किंमत किती ?

11 / 25

13 मी. 7 सेमी किती किलोमीटर ?

12 / 25

द.सा.द.शे. 9 दराने 8000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळव्याज किती ?

13 / 25

21 से.मी. त्रिज्येचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून 2 से.मी. बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे तयार होतील?

14 / 25

एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौ.मी. आहे तर त्याची परिमिती किती ?

15 / 25

पुढील वर्णमाला पूर्ण करा. E, F, H. K...........?

16 / 25

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 6, 12, 36, 144 ?

17 / 25

एका सांकेतिक भाषेत DEMAND हा शब्द DNAMED असे लिहितात. KRISHNA हा शब्द ANHSIRK असा लिहितात तर त्याच भाषेत QUESTION हा शब्द कसा लिहाल ?

18 / 25

'बासरी', गिटार', वीणा', सितार, व्हायोलीन' या गटातील विसंगत वाद्य कोणते ?

19 / 25

सांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDN हा शब्द असा लिहितात, तर VALLEY हा शब्द कसा लिहाल ?

20 / 25

विधाने :  I) काही गाजर वांग आहेत.

          II) काही वांगे सफरचंद आहेत.

III) सर्व सफरचंद केळी आहेत.

निष्कर्ष :  I) काही सफरचंद केळी आहेत. 

             II) काही केळी वांगे आहेत.

III) काही केळी गाजर आहेत,

21 / 25

2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला तर 2018 ला 23 मार्चला कोणता वार असेल ?

22 / 25

मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा राहून त्याचा क्रमांक 16 आहे त्याच्या उजवीकडे राम व डावीकडे हरि आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

23 / 25

रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूंने 15 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

24 / 25

एका घड्याळात 11 वाजून 45 मिनीटे झाली आहेत. तास काटा व मिनीट काटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील?

25 / 25

100 विद्यर्थ्यांच्या एका वर्गात इंग्रजी विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 35 आहे व गणितात 40 विद्यार्थी पास आहेत. त्या वर्गात इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात पास असणाऱ्या विद्यर्थ्यांची संख्या 10 आहे तर दोन्ही विषयात किती विद्यार्थी नापास झाले आहेत?

Your score is

0%

👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top