➡️ अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 👇👇
♦️प्रश्न – 1
निसर्ग निरीक्षणासाठी गेलेल्या तीन मैत्रिणीनी त्यांच्याकडील केळी सारखी वाटून घेतली. जेव्हा त्यांच्यातील प्रत्येकीने चार केळी खाल्ली तेव्हा त्यांच्याकडे एकूण मिळून सर्व केळ्यांच्या ½ केळी शिल्लक होती. तर सुरुवातीला त्यांच्याकडे असलेल्या एकूण केळींची संख्या दाखवणारा पर्याय निवडा.
21
24
18✓
15
➡️ स्पष्टीकरण 👇👇
प्रत्येकीने 4 केळी खाल्ली…
खाल्लेली केळी = 1/3
:: उरलेली केळी = 2/3
2/3 म्हणजे 12 केळी
1 म्हणजे __ ❓
1 × 12 × 3 / 2 = 18 केळी.
योग्य उत्तर = 18 ✅
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♦️ प्रश्न – 2
दीपने त्याचे 1/3 कार्य पाच दिवसात पूर्ण केले. त्याने त्याचे शिल्लक राहिलेले कार्य 6 दिवसात वसंतच्या सहाय्याने पूर्ण केले. जर वसंतला त्या कामाचे वेतन ₹ 360 मिळाले, तर दीपला त्याच्या कामाचे वेतन किती मिळेल ❓
1000
900
990✓
72
⭐️स्पष्टीकरण 👇👇
दीपने 1/3 कार्य 5 दिवसात पूर्ण केले.
दीपला पूर्ण काम करायला 15 दिवस लागतात.
• दिवसाला 1/15 काम करतो.
दीप 11 दिवसात 11/15 काम करतो.
• वसंत 4 / 15 काम करतो.
4 कामाचे वसंतला 360 रुपये.मिळतात
तर 11 कामाचे दिपला..
360 × 11 / 4 = 990 रुपये.मिळतील.
योग्य उत्तर = 990 रुपये ✅
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♦️प्रश्न – 3 ( बुद्धिमत्ता )
पुढील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?
43, 65, 56, 78, 69, ❓
91 ✓
81
89
92
⭐️ स्पष्टीकरण 👇👇
Number Series…..
43 + 13 = 56
65 + 13 = 78
78 + 13 = 91 होईल ..
योग्य उत्तर = 91 ✅
प्रत्येक एक आड एक संख्येत 13 चा फरक आहे 👍
➡️ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍👍