WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 59

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 59

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

तासी 50 किमी प्रतितास या वेगाने जाणारी एक रेल्वे एका विशिष्ट ठिकाणी 60 किमी. प्रतीतास या वेगाने 50 मिनिटे लवकर पोहचते तर ते अंतर किती ?

2 / 25

अंकिताचे घड्याळ प्रत्येक तासाला दोन मिनिटे पुढे जाते. आज तिने सकाळी 07.00 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11.00 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील ?

3 / 25

एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मेरी लिलीजवळ राहते. अमन सीमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो, तर ज्योतीजवळ कोण राहते ?

4 / 25

21-[15-{17-(15+3-2)]] = ?

5 / 25

जर 65+23 = 35, 38+75 58, 81 + 24 = 49+27=? 41 तर

6 / 25

जर CAT = 24, DOG = 26, तर HORSE साठी कोणता अंक असेल ?

7 / 25

एका अर्धवर्तुळाची परिमिती 72 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंमी आहे?

8 / 25

एका सांकेतिक भाषेत BECAUSE हा शब्द EHFDXVH असा लिहितात, तर WORLD हा शब्द कसा लिहावा?

9 / 25

सहा घंटा एकाच वेळी वाजण्यास सुरु झाल्या. त्या घंटा अनुक्रमे दर 2,4,6,8,10,12 सेंकदाच्या अंतराने वाजतात. तर 30 मिनिटांत किती वेळेस त्या एकत्र वाजतील ?

10 / 25

कविताचा जन्म 2 नोव्हेंबर रोजी झाला अनिता ही कविता पेक्षा दोन दिवसांनी मोठी आहे. त्या वर्षी बालदिन शुक्रवारी आलेला होता तर अनिताचा जन्म कोणत्या वारी झाला ?

11 / 25

एका रांगेत गीता हिचा डावीकडून सातवा क्रमांक असून तिच्या उजवीकडे दहाव्या क्रमांकावर असलेल्या मीना हिचा उजवीकडून चौदावा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहे?

12 / 25

शेजारी उभ्या असलेल्या स्त्रीचा परिचय करुन देतांना देवदत्त म्हणाला, हिच्या सासूची आई ती माझी सासू आहे. तर त्या स्त्रीचे देवदत्तशी कोणते नाते असेल ?

13 / 25

24 चे एकूण विभाजक किती ?

14 / 25

द.सा.द.शे. 20 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये 120 रुपये चा फरक आहे. तर ती रक्कम कोणती ?

15 / 25

उमेशला नरेशपेक्षा जास्त परंतु सुरेखपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. रमेशला महेशपेक्षा जास्त परंतु सुरेशपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. महेशला नरेशपेक्षा जास्त परंतु उमेशपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. उमेशला रमेशपेक्षा कमी परंतु नरेशपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर गुणांच्या दृष्टीने मध्यभागी कोण येईल ?

16 / 25

एका परीक्षेत विद्यार्थ्यांने 25 प्रश्न सोडविले. बरोबर आलेल्या उत्तराकरिता 5 गुण मिळतात व चुकलेल्या प्रत्येक उत्तराकरिता मिळालेल्या गुणांमधून 2 गुण कापले जातात. या परीक्षेत त्याला 76 गुण मिळाले तर त्याच्या चुकलेल्या प्रश्नांची संख्या किती ?

17 / 25

द.सा.द.शे. 10 दराने एका मुलाचे 2 वर्षांचे चक्रवाढव्याज व सरळव्याज यांतील फरक 20 रु. आहे, तर त्याच रकमेचे, त्याच दराने 5 वर्षांचे सरळव्याज किती ?

18 / 25

एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 18 कि.मी. हाकतो, आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुध्द दिशेने 2 तासात 10 कि.मी. हाकतो, तर प्रवाहाचा ताशी वेग किती ?

19 / 25

  1. एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करुन येणारी संख्या मुळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. तर ती मुळ संख्या कोणती ?

20 / 25

  1. बाबांनी आपल्याजवळील रकमेच्या 1/6 भाग रमाला 2/4 भाग मंजूला व 11/30 भाग सीमाला दिला. जर त्यांनी एकूण 210 रू. वाटले तर त्यांनी मंजूला किती रक्कम दिली ?

21 / 25

2 तास 40 मिनिटे + 1 तास 55 मिनिटे 15 मिनिटे किती ?

22 / 25

अजय एका गावाहून दुसऱ्या गावी जायला निघाल असता पहिले गावापासून 5 किमी अंतरावर जावून थांबला. तेथून दुसरे गाव 75.75 किमी अंतरावर आहे, या दोन्ही गावातील अंतर 5 तासात पूर्ण व करावयाचे असेल तर प्रत्येक तासाला त्याला किती किमी अंतर जावे लागेल ?

23 / 25

अ, ब आणि क यांना व्यापारात 40,000 रू. नफा झाला. तो त्यांनी अनुक्रमे 9:4:3 या गुणोत्तरात वाटून घेतला तर 'क' ला किती रूपये मिळाले असतील ?

24 / 25

एका हौदात एका नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास पाच तास लागतात. त्या हौदातील पाणी सोडण्यास दोन तोट्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक तोटी सोडली तर 20 तासांत हौद रिकामा होतो जर हा नळ आणि या दोन तोट्या एकाचवेळी सोडल्या तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल ?

25 / 25

दोन संख्यांचा मसावि 16 व लसावि 192 असून त्या दोन संख्येपैकी एक संख्या 48 असेल तर दुसरी संख्या कोणती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top