Maths Practice Test-16 ! गणित सराव टेस्ट

 

 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त  असलेला गणित विषय बऱ्याच मुलांना अवघड जातो . त्यामुळे गणिताचा जास्तीत जास्त सराव करा . गणित विषयातील सरासरी या घटकावर आधारित आजचे 10 सराव प्रश्न..

• सर्व प्रश्न इथून मागे झालेल्या परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत..त्यामुळे सर्वांनी पैकी ची पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

गणित सराव टेस्ट - 16

1 / 10

लाराच्या सलग पाच डावातील धावा अनुक्रमे 80,90, 100,100,m आहेत. जर त्या पाच डावांची त्याची सरासरी धावसंख्या 100 असेल तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या ?

2 / 10

अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवास गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतू व गावाकडून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एकसमान वेग 60 किमी होता. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी एकसमान ताशी वेग किती ?

3 / 10

एक सायकलस्वार ताशी सरासरी 10 किमी वेगाने 50 किमी आणि ताशी 12 किमी वेगाने 60 किमी अंतर गेला तर एकूण प्रवासात त्याचा ताशी सरासरी वेग किती ?

4 / 10

अ.ब.क या तिघांची खरेदी सरासरी 4,000 रु. आहे. तसेच ब, क, ड यांची सरासरी खरेदी 5,000रु. आहे. जर अ ची खरेदी 2,750 रु. असल्यास ड ची खरेदी किती ?

5 / 10

तीन संख्याची सरासरी 50 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त परंतू तिसरीपेक्षा 9 ने कमी आहे तर दुसरी संख्या कोणती?

6 / 10

एका वर्गातील 40 विदयार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किग्रॅ आहे. वर्गशिक्षकासह त्या सर्वांचे सरासरी वजन 36 किग्रॅ भरले तर वर्ग शिक्षकाचे वजन किती किग्रॅ असेल?

7 / 10

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

8 / 10

संपदा ऑफिसला जाताना 60 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 30 किमी/तास वेगाने करते तर तिचा सरासरी वेग किती ?

9 / 10

13 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्यांची सरासरी किती ?

10 / 10

राहुलने 5 एकदिवसीय सामन्यांत सरासरी 48 धावा केल्या. पहिल्या तीन सामन्यांची सरासरी 40 धावा असून चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या तर त्याने पाचव्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top