🔴 परीक्षेत विचारला जाणारा IMP प्रश्न
सोने आणि चांदीच्या 50 ग्रॅम मिश्र धातूत वजनाच्या रूपात 80 % सोने आहे या धातूत अजून किती सोने मिळवायला हवे की मिश्र धातूत 95 % सोने असेल ?
📚📚 स्पष्टीकरणासहित उत्तर👇
👇👇👇👇
100 ला 80
तर
50 X मानू
तिरकस गुणाकार करून,
50 × 80
X = —————–
100
X = 40
म्हणजे 50 ग्रॅम मध्ये 40 ग्रॅम सोने आणि 10 ग्रॅम चांदी आहे.
आता 10 ग्रॅम हे 5% करायचे आहे.
5% ला 10 ग्रॅम तर 100% ला किती ग्रॅम ?
5 ला 10
तर
100 ला x मानू
तिरकस गुणाकार करून,
100 × 10
X = ———————
5
X = 200
= 200 – चांदी
= 200 – 10
= 190
= 190 – पूर्वीचे सोने
= 190 – 40
= 150 ✅
तर अजून 150 ग्रॅम सोने मिळवल्यावर सोने-चांदीच्या मिश्रधातूत सोने 95% असेल.