🟣 गणित मंच सराव प्रश्न.- 5
विद्या जत्रेला जात होती तिच्यासोबत तिच्या दोन नणंदा आणि त्यांच्या तीन मैत्रिणी होत्या दोन्ही नणंदासोबत त्यांच्या प्रत्येकी दोन मुली होत्या. एका मैत्रिणीबरोबर तिचा एक मुलगा व दोन मुली होत्या.तर उर्वरित दोघींसोबत प्रत्येकी दोन मुले होती. वाटेत विद्या चा नवरा त्याचे तीन मित्र व त्यांच्या बायकांसह त्यांना येऊन मिळाळे तर स्त्री-पुरुष मुलं-मुली मिळून एकूण किती जण जत्रेला जात होते..?
❇️ स्पष्टीकरण :- गणेश सांगळे ,गणित मंच.
विद्या —- 1
2 नंदा + 3 मैत्रिणी = 5
2 नंदा सोबत प्रत्येकी 2 मुले = 4
1 मैत्रिणी बरोबर: एक मुलगा + 2 मुली = 3
उर्वरित दोघी सोबत : 2 मुले = 4
वाटेत विद्याचा : 1 नवरा + 3 मित्र+ 3 बायका =7
1+5+4+3+4+7= 24
एकूण जत्रेला जात असलेली संख्या = 24 ✅
🟣 गणित मंच सराव प्रश्न : – 6
एक तार वळवून तिला चौरस आकार दिल्यास 484 चौरस सेंटिमीटर क्षेत्र बंदिस्त करते.त्याच तारेला वर्तुळाकार आकार दिल्यास ती किती क्षेत्र बंदिस्त करेल..?
❇️ स्पष्टीकरण – गणेश सांगळे ,गणित मंच.
चौरासाचे क्षेत्रफळ = 484
बाजू = 22 सेंमी येईल.
चौरसाची परिमिती = 22 × 4 = 88 सेंमी
वर्तुळाचा परिघ = 88
88 × 7 / 22× 2 = 14
r = 14
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr वर्ग
22 × 14 ×14 / 7 = 616 चौ.सेमी.✅
■ गणित विषयात पैकी पैकी मार्क मिळवण्यासाठी www. Ganitmanch.Com गुगल वर सर्च करून दररोज एक गणित टेस्ट सोडवा. व आपल्या मित्रांना पण share करा.