■ यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती.
● रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते.
● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत.
● 7 मे 1861 मध्ये कलकत्ता येथे त्यांचा जन्म झाला होता.
● ते एक उत्कृष्ठ साहित्यीक व चित्रकार होते. त्यांनी 1901 मध्ये कलकत्याजवळ बोलपूर येथे शांतिनिकेतनची स्थापना केली होती. ती एक शाळा होती. तिचेच पुढे 1921 मध्ये विश्वभारती विद्यापीठात रुपांतर झाले.
● 1915 मध्ये सरकारने त्यांना सर ही पदवी दिली होती.
●1919 मध्ये टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर या पदवीचा त्याग केला होता.
● रविंद्रनाथांनी गीतांजली, लिपीका, गोरा, चित्रा इ. ग्रंथ लिहिले.
● त्यांनी जन-गण-मन हे राष्ट्रगीत लिहिले. बाग्लादेशाच्या आमार शोनार बांग्ला राष्ट्रगीताचेही जनक, 1913 मध्ये त्यांना जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ठ साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला मिळाला होता.
● त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1941 रोजी झाले.
● रविंद्रनाथ टागोरांनीच गांधींना महात्मा ही पदवी दिली होती.