Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 63

Mathematics & IT Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 63

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न.

1 / 25

A या ठिकाणच्या पूर्वेला 5 किमी दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरेला 5 किमी अंतरावर C हे ठिकाण आहे व C च्या पूर्वेला 7 किमी अंतरावर D हे ठिकाण आहे, तर A आणि D मधील सरळ अंतर किती ?

2 / 25

एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल ?

3 / 25

पोलीस हुतात्मा दिवस 2023 साली 21 ऑक्टोबरला शनिवार होता. तर 2020 साली कोणत्या वारी होता ?

4 / 25

विसंगत पर्याय ओळखा.

5 / 25

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ?

1  ( 7 ) 9

2  ( 4 )  5

5  ( ? )  106

6 / 25

राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरूध्द दिशेने चालण्यास सुरुवात केली. राज 3 km चालला आणि रॉय 4 km चालला. त्यानंतर राज उजवीकडे वळाला आणि 4 km चालला, तर रॉय डावीकडे वडाळा आणि 3 km चालला. तर ते दोघेही त्यांच्या सुरूवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत ?

7 / 25

एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले, गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला मिरची म्हटले, मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेंटाईन डे साजरा करतांना याच भाषेत मित्र - मैत्रिणींना काय देता येईल ?

8 / 25

एका प्रदर्शनात उंट, हत्ती, सिंह आणि बैल यांची क्रमाने 73 चित्रे लावली आहेत. तर 44 व्या क्रमांकावर कोणते चित्र येईल ?

9 / 25

98: 72::96:?

10 / 25

दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे /अक्षर गट क्रमाने दिलेले आहेत. या मालिकेतील पुढील कोणते अक्षर/अक्षरगट येईल हे ओळखून अचूक पर्याय निवडा. AC,?, GI, JL, MO, PR

11 / 25

पुढील उदाहरण सोडवा. 16 × 5 ÷ 10 + 4 - 3=?

12 / 25

प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 728, 783, 840, ?

13 / 25

शमीता ही राकेशची पत्नी व प्रदिपची बहिण आहे. जयदीप हे प्रदिपचे वडील आहेत. तर, जयदीप हे राकेशचे कोण ?

14 / 25

UGHNEO पासुन अथपुर्ण शब्द बनवा.

15 / 25

01 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा येतो ?

16 / 25

चौरस व समभुज चौकोन या चौकोनाचे कर्ण परस्परांना.............असतात

17 / 25

युवराजच्या तीन डावातील धावांची सरासरी 72 आहे. 4 थ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या चारही डावातील धावांची सरासरी एक ने कमी होते तर त्याच्या 4 थ्या डावातील धावांची संख्या किती ?

18 / 25

साडेनऊ हजार + पावणे एकोनवीस हजार + सव्वा एकोणसाठ हजार = ?

19 / 25

60 मधून एका संख्येची सहापट वजा केली तर त्या संख्येची चारपट उरते, तर ती संख्या कोणती ?

20 / 25

मागील वर्षी साखर 35 रुपये किलो होती, आता 42 रुपये किलो झाली, तर साखरेच्या भावात शेकडा किती वाढ झाली ?

21 / 25

एका नावेत सरासरी 25 किलो वजनाची 40 मुले आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलो आहे, तर नावाड्याचे वजन किती ?

22 / 25

800 चे 80% = ?

23 / 25

800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असतांना 1600 मीटर लांबीची प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल ?

24 / 25

25931 या संख्येतील 9 अंकाच्या स्थानिक किमतीतील व दर्शनी किमतीतील फरक किती ?

25 / 25

36 च्या पुढील 15 व्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top